भुवनेश्वर - ओडिशामधील केंद्रापाडा जिल्ह्यातील गरडपूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. गुरुवारी तेथील विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणामध्ये सरडा आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
धक्कादायक! ओडिशामधील क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणात आढळला मृत सरडा - Kendraapada news
ओडिशामधील क्वारंटाईन सेंटरमधील जेवणामध्ये सरडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणामध्ये सरडा अढळल्यानंतर कोणीही ते खाल्ले नाही. या घटनेची माहिती तत्काळ केंद्र प्रभारीला देण्यात आली.
quarantine centre
जेवणामध्ये सरडा अढळल्यानंतर कोणीही ते खाल्ले नाही. या घटनेची माहिती तत्काळ केंद्र प्रभारीला देण्यात आली. माहिती मिळताच गरडपूर बीडीओ रश्मी रंजन मल्लीक यांनी प्रकरणाची चौकशी केली असून क्वारंटाईन सेंटरमधील सर्व जण ठीक असल्याची खात्री केली. क्वारंटाईन सेंटरमध्ये 30 हून अधिक लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे. ते तेथे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी वास्तव्यास आहेत.