नवी दिल्ली - लग्नावर होणाऱ्या वारेमाप खर्चाला फाटा देत ओडिशामधील जगतसिंगपूर जिल्ह्यातील एक जोडप्याने लग्नगाठ बांधली. या नवदाम्पत्याने लग्नसमारंभाला होणारा खर्च टाळून 10 हजार रुपयांचा धनादेश कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे.
दोन कुटुंबांनी लग्नासाठी योजना आखल्या होत्या. मात्र, लाकडाऊनमुळे कुटुंबाची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. लग्नात वाचलेल्या पैशाचा हिस्सा आम्ही कोरोना साथीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचे ठरवले, असे वर ज्योती रंजन स्वैन यांनी सांगितले.
मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न लागले. यावेळी पालकांव्यतिरिक्त इरसामा पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि गटविकास अधिकारी (बीडीओ) लग्नाला उपस्थित होते. सामाजिक सोहळ्याचे निकष राखून हा सोहळा पार पडला.
देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी लग्न संमारंभांना प्रशासनाकडून परवानगी नकारण्यात येत आहे. त्यामुळे, मोजक्या नातेवाईकांसह विवाह इच्छुक युवक-यवती घरात लग्न करताना दिसून येत आहे. देशभर पसरलेल्या कोरोना संकटावर सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक लग्न लागली आहेत.