महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नवीन पटनाईक यांचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा, तर एनआरसीला विरोध

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे.

NAVIN PATNAIK
नवीन पटनाईक

By

Published : Dec 18, 2019, 7:26 PM IST

भुवनेश्वर- ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. बिजू जनता दल पक्षाचा एनआरसीला विरोध आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. अनेक काँग्रेस शासित राज्यांनी हा कायदा जातीयवादी असल्याचे म्हणत विरोध केला आहे.

हेही वाचा -सिंगल यूज प्लास्टिक : झारखंडमध्ये पुजाऱ्याने हाती घेतली प्लास्टिकमुक्ती मोहीम


नागरिकत्व सुधारणा कायदा भारतीय नागरिकांबाबत नाही. तर तो परदेशी नागरिकांबाबत आहे. बीजेडी पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांनी एनआरसीला पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. राज्यामध्ये शांतता पाळा, तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष: एबीव्हीपीचा कार्यकर्ता दिल्ली पोलिसांच्या ताफ्यात; जाणून घ्या 'व्हायरल' सत्य


नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी दोन्हींना अनेक राज्यातून विरोध होत आहे. पंजाब, पश्चिम बंगाल आणि केरळ राज्याने नागरित्व सुधारणा कायदा लागू होवू देणार नाही, अशी भुमीका घेतली आहे. काँग्रेस शासित राज्यांमध्ये नवीन कायद्याला चांगलाच विरोध पहायला मिळत आहे. मात्र, भाजपशासित राज्यांनी यावर स्पष्ट मत व्यक्त केले नाही. दिल्लीमध्ये आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये विधेयकाला मोठा विरोध होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले.

ABOUT THE AUTHOR

...view details