भुवनेश्वर - फनी चक्रीवादळानंतर ओडिशातील परिस्थितीचा आढावा घेणारी अधिकृत आकडेवारी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केली. '१२ लाख लोकांना २४ तासांमध्ये दुसरीकडे हलवण्यात आले. यातील गंजम येथील ३.२ लाख आणि पुरीतील १.३ लाख लोकांचा समावेश आहे. सुमारे ७ हजार स्वयंपाक केंद्रे आणि ९ हजार आसरा शिबिरे एका रात्रीत तयार करण्यात आली आहेत. यासाठी ४५ हजार स्वयंसेवक अहोरात्र खपत आहेत,' अशी माहिती पटनाईक यांनी दिली. आतापर्यंत मृतांची संख्या एक आकडी असल्याचे ते म्हणाले.
फनीचा कहर.. ओडिशाचे मुख्यमंत्री पटनाईक यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, अधिकृत आकडेवारी जाहीर - cm naveen patnaik
'फनी' चक्रीवादळाने भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आक्रमण केले. वादळग्रस्त परिसरात मुसळधार पावसानेही हजेरी लावली होती. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या सूचनांमुळे आधीच सावध राहून केलेल्या बचावकार्यामुळे बरेचसे नुकसान होण्यापासून वाचले आहे.
'फनी' चक्रीवादळाने भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आक्रमण केले. वादळाने ओडिशाच्या किनारपट्टीवर धडक दिली, त्यावेळी वाऱ्याची गती १७५ किमी प्रति तास होती. वादळग्रस्त परिसरात मुसळधार पावसानेही हजेरी लावली होती. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या सूचनांमुळे आधीच सावध राहून केलेल्या बचावकार्यामुळे बरेचसे नुकसान होण्यापासून वाचले आहे. येथील मोठ्या प्रमाणात मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. याआधी आंध्र आणि सध्या पश्चिम बंगालच्या किनारी भागातही जोरदार वाऱ्याचा तडाखा बसत आहे. मात्र, याची तीव्रता हळूहळू कमी होत असून ते बांग्लादेशाच्या दिशेने सरकत आहे.
चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालमधील जनजीवन विस्कळीत झाले असून रेल्वे, विमानसेवा ठप्प झाल्या आहेत. तब्बल २२० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.