महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मी १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा साधारण व्यक्ती - मोदी

Howdy Modi

By

Published : Sep 22, 2019, 9:40 PM IST

Updated : Sep 23, 2019, 3:26 AM IST

21:29 September 22

मी १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा साधारण व्यक्ती - मोदी

वॉशिंग्टन डी. सी. - अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाला सुरुवात झाली. 'टेक्सास इंडिया फोरम'ने हा कार्यक्रम आयोजित केला असून, भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर भाष्य करत उभयतांतील मैत्रीबद्दल विश्वास व्यक्त केला.

  • १२.१० AM : कलम ३७० ला देखील फेअरवेल दिले. कलम ३७०ने जम्मू-काश्मीर व लडाखच्या लोकांना विकास आणि समाजापासून वंचित ठेवले होते. आता भारतातील लोकांना जे अधिकार आहेत, तेच या लोकांना मिळत आहेत. स्थानिक महिला, दलितांसोबत होणारा भेदभाव संपुष्टात आला आहे.
  • १२.०५ AM : वेलफेअर सोबतच फेअरवेललाही महत्त्व : २ ऑक्टोबरला भारत उघड्यावर शौच करण्यास (ओपन डेफिकेशन) फेअरवेल देणार आहे.
  • १२.०० AM : केंद्र आणि राज्य सरकारच्या १०,००० सुविधा ऑनलाईन उपलब्ध; नवीन कंपनीचे २४ तासांत रजिस्ट्रेशन; एका आठवड्यात पासपोर्ट घरी - पंतप्रधान मोदी
  • ११.५५ PM : 'डेटा इज न्यू गोल्ड' : जगात सगळ्यात कमी किंमतीमध्ये भारतात डेटा उपलब्ध आहे. देशात एक जीबी डेटाची किंमत २५ सेंट असून, जागतिक सरासरी यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त -  नरेंद्र मोदी
  • ११.५० PM : ग्रामीण स्वच्छता (रूरल सॅनिटेशन) ९९ टक्क्यांवर तसेच २००० किमी पेक्षा जास्त रस्ते तयार केल्याची पंतप्रधानांकडून माहिती.
    आधी ५० टक्क्यांहून कमी लोकांची बँक खाती होती. १०० टक्के लोकांचे अकाऊंट्स आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • ११.४० PM : आज भारताचा सर्वात मोठा मंत्र आहे - 'सब का साथ सब का विकास'
  • ११.३५ PM : अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट लोकांनी भारतात लोकांनी मतदानात सहभाग घेतला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात जास्त प्रमाणात महिलांनी मतदान केले. आणि साठ वर्षांनंतर पहिल्यांदाच एखादी सरकार पूर्ण बहुमताने निवडून आली. आणि हे सर्व मोदीमुळे नाही तर सामान्य भारतीयांमुळे झाले - मोदी
  • ११.३३ PM :भारतीय जिथेही जातो, विविधता आणि लोकशाहीचे संस्कार सोबत घेऊन जातो - मोदी
  • ११.३० PM : भारताची विविधता हीच भारताची ताकद - मोदी
  • ११.२५ PM : मी १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा साधारण व्यक्ती - मोदी
  • ११.२० PM : मोदींच्या भाषणाला सुरुवात
  • १०. 56 PM: डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाला सुरुवात
  • १०. ५० PM: अब की बार... ट्रम्प सरकार! - मोदी
  • १०. ४५ PM: ट्रम्प यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. - मोदी
  • १०. ४० PM: ट्रम्प यांचे नाव जगातील सर्व लोकांना माहिती आहे. जागतिक राजकारणाचा विषय आला की त्यांचा उल्लेख टाळता येत नाही. राष्ट्राध्यक्ष होण्याच्या आधीपासूनच लोकांना ते माहिती होते.- पंतप्रधान मोदी
  • १०.३९ PM: पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प मंचावर दाखल
  • १०.२८ PM : डोनाल्ड ट्रम्प यांचे स्टेडिअममध्ये आगमन, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले स्वागत
  • १०.०० PM: भारत हा अभूतपूर्व लोकांचा अभूतपूर्व देश. भारतीय वंशांच्या हजारो अमेरिकन लोकांनी अमेरिकेला घडवण्यास मदत केली आहे. गांधींची शिकवण आणि नेहरूंचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन आपण वाटचाल केली पाहिजे. नव्या भारताकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते - स्टेनी होयर, हाऊस मेजॉरिटी लीडर
  • ९.५० PM : अमेरिकेच्या पूर्व राष्ट्राध्यक्षांनी भारत आणि अमेरिकेमधील संबंध वृद्धिंगत केले. ट्रम्प ही परंपरा समर्धपणे पुढे चालवत आहेत - स्टेनी होयर
  • ९.४५ PM : पंतप्रधान मोदी यांचे मंचावर आगमन
  • ९.४० PM : अमेरिकेचे ज्युनिअर सिनेट सदस्य टेड क्रूझ - जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश हा आपला मित्र असल्याचा अमेरिकेला अभिमान आहे.
  • ९.३० PM : अमेरिकेचे काँग्रेसीय प्रतिनिधींचे मंचावर आगमन
  • ९.३० PM : मोदी यांचे स्टेडिअममध्ये आगमन.
Last Updated : Sep 23, 2019, 3:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details