महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CORONAVIRUS : देशात 1 हजार 694 कोरोनाग्रस्तांचा बळी..बाधितांचा आकडा 50 हजाराच्या उंबरठ्यावर - India's COVID-19 death

देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 49 हजारच्या घरात पोहचली आहे. तर 1 हजार 694 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे.

#COVID19 positive cases in India
#COVID19 positive cases in India

By

Published : May 6, 2020, 9:30 AM IST

Updated : May 6, 2020, 9:40 AM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 49 हजारच्या घरात पोहचली आहे. तर 1 हजार 694 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 49 हजार 391 वर पोहचला आहे. तर यामध्ये 33 हजार 514 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, 14 हजार 182 जण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांचा आकडा १ हजार 694 झाला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन तीसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत.

Last Updated : May 6, 2020, 9:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details