महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लडाख आणि तामिळनाडूत कोरोनाचे तीन रुग्ण, देशभरात ३४ जणांना लागण - चीन कोरोना

कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने देशवासियांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी केले असून गर्दी असलेल्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे.

कोरोना संसर्ग
कोरोना संसर्ग

By

Published : Mar 7, 2020, 8:40 PM IST

नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा ३४ वर पोहचला आहे. नुकतेच इराणमधून प्रवास करून आलेल्या लडाखमधील दोन नागरिक आणि ओमान देशातून प्रवास करून आलेल्या तामिळनाडूतील एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी दिली.

या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे कुमार म्हणाले. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने देशवासियांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी केले असून गर्दी असलेल्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. तसेच, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे टाळावे, असे आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा -राज्यसभेत देशातील कोरोना संसर्गावर चर्चा, आरोग्य मंत्री म्हणाले...

कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये जवळपास १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्येही मृतांचा आकडा वाढत आहे. चीनमध्ये ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आशियायी देशांमध्येही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. हस्तांदोलन, गर्दीतून प्रवास, सार्वजनिक कार्यक्रम, टाळण्याबरोबरच शारिरीक स्वच्छता पाळण्यासाठी सरकारकडून जनजागृती करण्यात येत आहे.

१८ जानेवारीपासून देशात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड या देशातील नागरिकांची पहिल्यापासूनच तपासणी करण्यात येत आहे. आता परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. एन ९५ मास्क आणि अन्य वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा तयार ठेवण्यात आल्या आहेत. तर १९ आणखी तयार करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी एक कॉल सेंटरही उभारण्यात आले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आम्ही संपर्कात आहोत. इराणमधील तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

हेही वाचा -जैशच्या सांगण्यावरून पुलवामा हल्ल्यासाठी जमवली केमिकल्स, दोन दहशतवाद्यांना अटक

चीनमधील वुहानमध्ये अडकेलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. तेथून आलेल्या नागरिकांची 'टेस्ट निगेटिव्ह' आहे. चीन, जपान, इटलीला जाणाऱ्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. गरज नसेल तर चीन आणि इटलीला जाऊ नका. ४ मार्चपर्यंत ६ लाख ११ हजार १७६ प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या मदतीसाठी आरोग्य मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

हेही वाचा -"पनवेल महानगरपालिका क्षेत्रात चार कोरोना रुग्ण आढळल्याची अफवा"

ABOUT THE AUTHOR

...view details