गुवाहाटी - आसाममधील गुवाहाटी आणि दिलबर्ग जिल्ह्यामधील संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी उठवण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे, दहा जिल्ह्यांमधील इंटरनेट बंदी आणखी २४ तासांसाठी वाढवण्यात आली आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. आसाममध्ये या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर, राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तर, राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली होती.