नवी दिल्ली - आज भाजपचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध झाला. या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीपूर्वीच ट्विटरवर #BJPJumlaManifesto हा हॅशटॅग लोकप्रिय झाला आहे. भाजपने या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे. मात्र, याला ट्विटरवर मोदी लॉलीपॉप, जुमला मॅनिफेस्टो अशी विविध नावे दिली जात आहेत. अनेकांनी व्यंगचित्रांच्या आणि चारोळ्यांच्या माध्यमातून या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे.
भाजपच्या 'संकल्प पत्र' वर BJPJumlaManifesto हॅशटॅग ट्रेंडींगवर, भन्नाट मीम्स व्हायरल - congress
भाजपच्या फिर एक बार मोदी सरकार, अच्छे दिन आयेंगे या घोषणांचेही विडंबन करण्यात आले आहे. #BJPJumlaManifesto हॅशटॅग २०.५ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. यात काँग्रेस कार्यकर्ते आणि पक्षातील विविध पदांवरील व्यक्तींचे संदेश मोठ्या प्रमाणात आहेत
भाजप जाहीरनामा
भाजपच्या फिर एक बार मोदी सरकार, अच्छे दिन आयेंगे या घोषणांचेही विडंबन करण्यात आले आहे. याच्याशी संबंधित ट्विटसचा पाऊस पडत आहे. #BJPJumlaManifesto हॅशटॅग २०.५ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. यात काँग्रेस कार्यकर्ते आणि पक्षातील विविध पदांवरील व्यक्तींचे संदेश मोठ्या प्रमाणात आहेत.
Last Updated : Apr 8, 2019, 1:24 PM IST