महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये एनएसयूआय पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या - सोनू पारोचिया हत्या न्यूज

मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये पुर्ववैमनस्यातून एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाली. हत्या झाली तेव्हा मृत सोनू पारोचिया हा काकांचा वाढदिवस साजरा करून घरी परतत होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) विक्रमसिंह कुशवाह यांनी दिली.

Dead Sonu Parochia
मृत सोनू पारोचिया

By

Published : Jun 27, 2020, 6:58 PM IST

भोपाळ(मंडला) - मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये एका २८ वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृत तरुण हा नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) चा स्थानिक पदाधिकारी होता.

मंडलामध्ये एनएसयूआय पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या

शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. पुर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मयूर हॅपी यादव (वय 30) याला ताब्यात घेतले आहे. हत्या झाली तेव्हा मृत सोनू पारोचिया हा काकांचा वाढदिवस साजरा करून घरी परतत होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) विक्रमसिंह कुशवाह यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार पारोचियाच्या दुचाकीला यादवच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यानंतर आरोपीने पारोचियावर गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, असेही कुशवाह म्हणाले. ही घटना घडली तेव्हा पारोचियासोबत त्याचे दोन मित्रही होते.

मृत सोनू पारोचिया हा मंडला जिल्हा युनिटचा सरचिटणीस होता, अशी माहिती एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अखिलेश ठाकूर यांनी दिली. आरोपी यादव हा मूळचा जबलपूर येथील असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तो मंडला येथे राहत आहे. त्याच्याविरूद्ध अनेकवेळा पोलिसांत तक्रार केली आहे, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details