महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अजित डोवाल यांनी घेतली हिंदू-मुस्लीम नेत्यांची भेट.. - अजित डोवाल

यावेळी, उपस्थित सर्व नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सोबतच, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारची सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

अजित डोवाल यांनी घेतली हिंदू-मुस्लीम नेत्यांची भेट..

By

Published : Nov 10, 2019, 9:59 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नेत्यांची एक बैठक बोलावली होती. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी ही बैठक घेण्यात आली.

अजित डोवाल यांनी घेतली हिंदू-मुस्लीम नेत्यांची भेट..
यावेळी, उपस्थित सर्व नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सोबतच, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारची सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. साधारणपणे चार तास ही बैठक सुरू होती. यामध्ये उपस्थित सर्वांना या गोष्टीची जाणीव होती, की देशविरोधी घटक हे देशाबाहेर आणि देशांतर्गतही कार्यरत आहेत. या प्रकरणाचा फायदा घेण्यासाठी ते प्रयत्न करतील. त्यामुळे त्याविरोधात लढण्यासाठी या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे सरकारला मदत करण्याचे आश्वासन दिले, असे बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details