नवी दिल्ली - सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहेत. यातच भारताच्या सुरक्षेला धोका असेल तर भारत फक्त आपल्या भूमीत राहूनच लढणार नाही, तर परदेशात जाऊनही लढेल, असे विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले होते. अजित डोवाल यांच्या विधानावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अजित डोवाल यांचे विधान चीन संदर्भात नाही. तर भारताच्या अध्यात्मिक विचारांवर होते, असे केंद्र सरकारने म्हटलं आहे.
अजित डोवाल यांनी कोणत्याही देशाचा किंवा विशिष्ट परिस्थितीचा उल्लेख करत, ते वक्तव्य केले नाही. ते चीन किंवा पूर्व लडाख प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाविषयी बोलत नव्हते, असे सरकारी अधिकाऱ्यांनी, काही माध्यमांचे अहवाल पाहिल्यानंतर स्पष्ट केले आहे.