नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव म्हणून नृपेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. मिश्रा हे मोदींच्या आधीच्या कार्यकाळातही मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. यावेळी पुन्हा त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर पी. के. मिश्रा यांची पंतप्रधानांच्या अतिरिक्त सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी पुनर्नियुक्ती, देण्यात आला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा - bjp
नृपेंद्र मिश्रांची आगामी ५ वर्षांसाठी मोदींचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासह पी. के. मिश्रा यांना अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
मानव संसाधन मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०१४ मध्ये नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी निवड करण्यात आली होती. त्यांनी पूर्ण ५ वर्षे मोदींची मुख्य सचिव म्हणून काम पाहिले. या कार्यकाळातही त्यांची आगामी ५ वर्षांसाठी मोदींचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासह पी. के. मिश्रा यांना अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
नृपेंद्र मिश्रा हे २००६ ते २००९ दरम्यान भारतीय दूरसंचार नियमन मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ते उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी असून त्यांनी राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांच्या शिफारसीनुसारच २००७ मध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला होता.