पाटना - कोरोना विषाणूचा जगभर झालेला प्रसार पाहता, जगभरातील संशोधक या आजारावर औषध शोधण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे. काही संशोधकांकडून लस शोधण्यात येत आहे. मात्र, त्याचा प्रयोग मनुष्यावर होणे आवश्यक आहे. परंतु, एवढी मोठी जोखीम घेण्यास कोणीही पुढे येत नाहीये. मूळ बिहारचा सध्या अबुधाबी येथे राहत असणाऱ्या रितेश मिश्रा या तरुणाने मात्र देशापुढील संकट पाहून अशा औषधांच्या प्रयोगासाठी आपले शरीर दान करण्याची इच्छा प्रकट केली आहे.
रितेश मिश्रा याने पाठवलेला मेल... हेही वाचा...कोरोना चाचण्या मोफत करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
अबुधाबी येथून पाठवला संदेश...
रितेश मिश्रा हा मूळ बिहारच्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील नरकटियागंज येथील रहिवासी आहे. तो एक अभियंता असून सध्या अबुधाबी येथे वास्तव्यास आहे. आपल्या माय देशावर आलेले कोरोनाचे संकट पाहून त्याने आपले शरीर कोरोनाच्या संभाव्य औषधाच्या प्रयोगासाठी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्याने पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना एक मेल पाठवला आहे.
'मी जगेल ना जगेल, हा देश जगला पाहिजे'
रितेश याने पाठवलेल्या पत्रात आपण जगलो नाही तरी चालेल. मात्र, हा देश (भारत) जगला पाहिजे, अशा समर्पित भावनेने आपले शरीर दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.