कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर एनआरसी मुद्यावरून हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.
एनआरसीच्या नावाखाली काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. परक्या नेत्यांवर विश्वास ठेवू नका. आमच्यावर विश्वास ठेवा, काळजी करण्यासारखी कोणतीच गोष्ट नसून मी बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा, असे ममता यांनी म्हटले आहे.