महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उद्धव ठाकरेंना सीएएची पुन्हा ओळख करून देण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर मनीष तिवारींचे ट्वीट - manish tiwari speaks on uddhav thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सीएए आणि एनआरसीला घाबरण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर आता काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

manish tiwari on uddhav thackeray
काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

By

Published : Feb 22, 2020, 7:12 PM IST

नवी दिल्ली -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सीएए आणि एनआरसीला घाबरण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर आता काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी ठाकरे यांना भारतीय नागरिकत्व कायद्यावर संक्षिप्त स्वरूपात माहिती देण्याची आवश्यकता असल्याचे ट्वीट केले आहे. तसेच यासाठी उद्धव ठाकरे यांना नागरिकत्व कायदा नियमावली-२००३ समजावली पाहिजे, असे ते म्हणाले. यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचा एनआरसीसोबत असलेला संबंध त्यांनी अधोरेखित केला असून एनपीआर केल्यानंतर एनआरसी थांबवता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सीएए बाबत पुढे बोलताना, भारतीय संविधानाची रचना धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणारी किंवा नाकारणारी नाही, या बाबीची उद्धव ठाकरेंना पुन्हा ओळख करून देण्याची आवश्यकता आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details