महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अमित शाह खोटं बोलतायेत ? ओवेसींचा एनपीआरवरून हल्लाबोल - नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर

एनआरसी देशभरामध्ये लागू केली जाईल, असे अमित शाहा संसदेत सांगितले होते. एनपीआर ही एनसीआर लागू करण्याचे पहिले पाऊल आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या २०१८ -१९ सालच्या अहवालामध्ये लिहले आहे - ओवेसी

असदुद्दीन ओवेसी, asaduddin owaisi
असदुद्दीन ओवेसी

By

Published : Dec 25, 2019, 1:23 PM IST

हैदराबाद - नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणजे नॅशनल सिटीझनशिप रजिस्टर बनवण्याचे पहिले पाऊल आहे. अमित शाहा देशाची दिशाभूल करत आहेत. जोपर्यंत सूर्य पुर्वेकडून उगवत राहील तोपर्यंत मी सत्य सांगत राहील, असे म्हणत एमआयएम पक्षाचे नेत आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एनपीआरला विरोध केला.

हेही वाचा -एनआरपीची माहिती एनआरसीसाठी वापरली जाणार नाही -अमित शहा


केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी एनपीआर आणि जनगननेच्या कार्यक्रमाला मंजूरी दिली. यावर ओवैसींनी टीका केली. काल(मंगळवारी) अमित शाहांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओवैसी यांच्यावर टीका केली होती. ओवैसी कायमच विरोधी भूमिका घेतात असे अमित शाह म्हणाले होते, त्याला आज ओवैसींनी उत्तर दिले.

एनआरसी देशभरामध्ये लागू केली जाईल, असे अमित शाह यांनी संसदेत सांगितले होते. एनपीआर ही एनसीआर लागू करण्याचे पहिले पाऊल आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या २०१८ -१९ सालच्या अहवालामध्ये लिहले आहे. अमित शाहांनी या अहवालातील १५ वा धडा वाचाव. यातील ४ मुद्द्यात एनपीआर एनआरसीची पहिली पायरी असल्याचे म्हटले आहे, असे ओवैसी यांनी सांगितले.

हेही वाचा -#CAA कोलकाता : राज्यपालांना विद्यापीठात येण्यापासून रोखले, विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनीही दाखवले काळे झेंडे


नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरामध्ये विरोध झाला. यावेळी झालेल्या हिंसक आंदोलनात उत्तर प्रदेशात १८ जणांना प्राण गमवावे लागले. त्यांची स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, अशी मागणी ओवैसींनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details