नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्याची घोषणा केली होती. त्याला आज (रविवारी) 4 वर्षे पूर्ण झाली. या निर्णयामुळे काळा पैसा भारतीय अर्थव्यवस्थेतून बाद होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. मात्र, याच्या उलट घडले. बाद केलेल्या जुन्या नोटांपैकी तब्बल 99 टक्के नोटा या बँकेत परत आल्या. मोदी यांच्या या निर्णयामुळे अनेक महिने चलन तुटवडा निर्माण झाला होता. अनेक व्यवहार ठप्प झाले होते. त्यांच्या या निर्णयाचे परिणाम आजही काही उद्योगांना भोगावे लागत आहेत.
"मित्रोंsss...!" नोटाबंदीला आज झाली 4 वर्षं...
नोटाबंदीला आज 4 वर्षं पूर्ण झाली आहेत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता भारतीय चलनातून ५०० आणि १००० रुपयां नोटा बाद झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यांच्या या निर्णयाचे परिणाम आजही काही उद्योगांना भोगावे लागत आहेत.
नोटाबंदी
नोटबंदीनंतर -
- नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) वार्षिक अहवालानुसार 2019 मध्ये सर्वाधिक बनावट नोटा 2000 रुपयांच्या नोटा आहेत.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालातील आकडेवारीवरून असेही समोर आले आहे की, गेल्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांची एकही नोट छापली गेली नाही.
- 2019-20 मध्ये सर्व सुरक्षा सुविधा असूनही 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा वाढल्या आहेत.
- नोटाबंदीचा एक सकारात्मक परिणाम सुरुवातीला जाणवला तो कॅशलेस व्यवहारांमध्ये. स्थानिक मंडळांच्या सर्वेक्षणानुसार प्रामुख्याने रोख व्यवहाराचा वापर करणारे भारतीयांमध्ये 50 टक्के घट झाली आहे.
- नोटाबंदीनंतर 2016 ते 2018 दरम्यान सुमारे 50 लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या.
Last Updated : Nov 8, 2020, 12:03 PM IST