महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मानवी त्वचेवर कोरोना विषाणू किती तास जिवंत राहतो ? पाहा संशोधनातील निष्कर्ष - कोविड व्हायरस बातमी

कोरोना विषाणू किती काळ मानवी त्वचेवर जीवंत राहू शकतो, यावर जपानमधील क्योटो प्रीफेक्चरल विद्यापीठाने संशोधन केले आहे. हा अभ्यास संसर्गजन्य आजार जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 9, 2020, 4:40 PM IST

नवी दिल्ली -सार्स-सीओव्ही-२ विषाणूमुळे कोरोनाचा संसर्ग होतो. यालाच कोविड-१९ असेही म्हटले जाते. मार्च महिन्यापासून जगभर कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर त्यावर विविध संशोधनही सुरू झाले आहेत. त्यातून विषाणूबद्दल अनेक नवी माहिती समोर येत आहे. सुमारे ९ तास कोरोनाचा विषाणू मानवी त्वचेवर जिवंत राहत असल्याचे नव्या अभ्यासात समोर आले आहे. सामान्य फ्लूपेक्षा जास्त काळ कोरोना विषाणू मानवी त्वचेवर जिवंत राहत असल्याची माहितीही अभ्यासातून पुढे आली आहे.

जपानमधील 'क्योटो प्रीफेक्चरल विद्यापीठाने' हे संशोधन केले आहे. एन्फुएन्झा ए व्हायरस (IAV) सुमारे दोन तास मानवी त्वचेवर जिवंत राहत असल्याचे संशोधकांनी सांगितले. संसर्गजन्य आजार जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. साधा फ्लू आणि कोरोना विषाणू हँन्ड सॅनिटाझरच्या वापराने नष्ट होत असल्याचे अभ्यासात मान्य करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सॅनिटायझरचा वापर आणि हात वारंवार धुणे गरजेचे असल्याचे यात नमूद केले आहे.

जगभरात आत्तापर्यंत ३ कोटी ६० लाखांपेक्षाही जास्त कोरोनाचे एकूण रुग्ण आढळले आहेत. तर १० लाख ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, भारत, ब्राझील, रशियासह जगभरातील अनेक देशांत प्रसार वाढत आहे. कोरोनावरील लस अनेक देशांमध्ये विकासाच्या टप्प्यावर असून अद्याप लस बाजारात आलेली नाही. त्यामुळे सगळ्याच देशांकडून नागरिकांना कोविड नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details