बीजिंग -चीनसह जगभरात दहशत माजवलेल्या कोरोना विषाणूचे संकट आता अधिकच गडद झाल्याचे समोर येत आहे. कोरोना विषाणूची लागण एकमेकांच्या थेट संपर्कातून तसेच स्पर्शाद्वारेही होत असल्याचे आत्तापर्यंत समोर आले होते. मात्र, आता थेट हवेतूनही कोरोनाची लागण होत असल्याचे चीनमधील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाची लागण रोखण्याचे मोठे आव्हान जगासमोर उभे राहिले आहे.
हेही वाचा -कोरोनाचे थैमान : मृतांची संख्या ८०० वर, सार्सच्या बळींचा आकडा ओलांडला
हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या सूक्ष्म कणांतून (सूक्ष्म द्रव बिंदू) या विषाणूची लागण एकाकडून दुसऱ्याला होत आहे. याला 'एरोसोल ट्रान्समिशन' असे म्हटले जाते. विषाणू सूक्ष्म द्रवकणांमध्येही मिसळत असल्याने श्वास घेण्यातूनही याचा फैलाव होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यादृष्टीने आपली आणि कुटुंबाची खबरदारी घ्यावी असे, शांघाई सिवील अफेयर्स ब्युरोचे उपमुख्य अधिकारी झेंग क्वॉन यांनी सांगितले.