नवी दिल्ली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा परीक्षा -2020 पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्था करण्याचे सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सर्दी आणि खोकला असलेल्या यूपीएससीच्या उमेदवारांना स्वंतत्र बसण्याची व्यवस्था करावी, असे आदेशयूपीएससीला दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम आणि प्रक्रिया राबविण्याचे आदेशही सर्वाच्च न्यायालयाने आयोगाला दिले आहे. यूपीएससीच्या परीक्षा केंद्राजवळ असलेल्या हॉटेलमध्ये उमेदवारांची राहण्याची व्यवस्था करावी, यासाठी यूपीएससीने राज्यांना विनंती करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. विविध राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठीची प्रक्रिया वेगवेगळी असल्याने न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
काय म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात?
- काही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी ही शेवटची संधी आहे. अशा विद्यार्थ्यांचे वय विचारात न घेता त्यांना एकवेळ परीक्षा देण्याबाबत आयोगाने विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सूचविले आहे.
- काही परीक्षेला सामोरे जाणारे उमेदवार हे कोरोना योद्धा म्हणून जबाबदारी बजावित आहेत. ही परीक्षा दहा लाख विद्यार्थी देणार आहेत. प्रत्येकासाठी व क्षेत्रासाठी स्वतंत्र आदेश देणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे.
लोकसेवा आयोगाने ही मांडली सर्वोच्च न्यायालयात भूमिका