नवी दिल्ली - अमेरिकेमध्ये भारतातील काही शहराची नावे असलेली ठिकाणे आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरे आहे. अमेरिकेमध्ये दिल्ली, कोलकाता, बॉम्बे आणि लखनऊ या नावांची शहरे आहेत. अमेरिकी भारतीय दूतावासाने टि्वट करुन यासंबधीत माहिती दिली आहे.
अमेरिकेमध्ये आहेत भारतातील 'ही' शहरे, भारतीय दूतावासाने दिली माहिती - अमेरिकेमध्ये दिल्ली,
अमेरिकेमध्ये भारतातील काही शहराची नावे असलेली ठिकाणे आहेत. अमेरिकी भारतीय दुतवासाने टि्वट करुन यासंबधीत माहिती दिली आहे.
अमेरिकेमधील तब्बल ९ शहरांची नावे ही भारतीय शहरांच्या नावावर आहेत. हे तुम्हाला माहित आहे का? तुमच्या अमेरिका यात्रेवेळी तुम्ही दिल्ली, लखनऊ आणि कोलकाता या शहरांना नक्की भेट द्या. असे टि्वट #युएसए-भारत मैत्री या हैशटॅगसह अमेरिकी भारतीय दूतावासाने केले आहे.
भारत आणि अमेरिका यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत. ट्रम्प यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी ह्यूस्टनमध्ये बहुचर्चित 'हाउडी मोदी'चा कार्यक्रम झाला. या सभेत मोदी आणि ट्रम्प यांनी दहशतवादाविरोधात एकत्रित संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. मोदींच्या सभेसाठी ५० हजारांपेक्षा जास्त अमेरिकन-भारतीय उपस्थित राहिले होते. अमेरिकन लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.