कोलकाता- कोरोनाशी लढा देण्यासाठी जगभरातील 'कोरोना वॉरियर्स' हे दिवसरात्र मेहनत करत आहेत. यांमध्ये डॉक्टर आणि पोलीस अग्रस्थानी असले, तरी प्रशासन चालवणारे मंत्री आणि नेतेही यांच्यासोबतच कोरोनाशी सामना करत आहेत. आपापल्या देशांमध्ये-राज्यांमध्ये सुव्यवस्था रहावी यासाठी हे लोकप्रमुख अविरतपणे काम करत आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत बोलताना म्हटले, की लोक आम्हाला त्यांचे नेतृत्व करण्यासाठी निवडून देतात. ते संकटात असताना आम्हाला झोप येणे कसे शक्य आहे? दिवसभर आम्ही या लोकांसाठी घराबाहेर पडून काम करतो. त्यानंतर रात्रीही आम्हाला व्हर्च्युअल पद्धतीने काम करतच राहतो. मंगळवारपासून मला डोकेदुखीचा त्रास होतो आहे, मात्र आम्हाला आराम करण्यासाठीही वेळ नाही, असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हटल्या.