नवी दिल्ली - देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. मुस्लिम शेजाऱ्यांनी आम्हाला दिवाळी साजरी करु दिली नाही, असा आरोप अभिनेता विश्वा भानू यांनी केला आहे. विश्वा भानू यांनी याबाबत तक्रार केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही याविषयी टि्वट करून टॅग केले आहे.
मी मुस्लिम सोसायटीमध्ये राहत आहे. आज रात्री सोसायटीमधील मुस्लिम लोकांनी माझ्या पत्नीला घराबाहेर रांगोळी काढण्यापासून रोखले. त्यांनी आम्ही घराबाहेर लावलेले दिवे आणि रोषणाई काढून टाकली, असे ट्विट भानू यांनी केले आहे.