नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. शासन आणि प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यामध्ये रेल्वे प्रशासनही आपले योगदान देत आहे. उत्तर रेल्वे विभागाने सॅनिटायझर आणि मास्क बनवण्याचे काम सुरू केले आहे.
लढा कोरोनाविरुद्ध: उत्तर रेल्वेकडून सॅनिटायझर-मास्कची निर्मिती - रेल्वे प्रशासन
शासन आणि प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यामध्ये रेल्वे प्रशासनही आपले योगदान देत आहे. उत्तर रेल्वे विभागाने सॅनिटायझर आणि मास्क बनवण्याचे काम सुरू केले आहे.
रेल्वे प्रशासन
हेही वाचा -देशातील कोरोनाबाधितांची संख्या २,३०१; आतापर्यंत ५६ बळी..
आत्तापर्यंत उत्तर रेल्वे विभागाने ३२५ लिटर सॅनिटायझर आणि ६०० मास्क तयार केले आहेत. रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच बंद असलेल्या रेल्वेबोगींचे रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत ४० कोचचे रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आवश्यक अन्न-धान्य, औषधांचा साठा देशभरात पोहचवण्यासाठी अतिरिक्त मालगाड्यांची व्यवस्था केली आहे.