नोएडा (उत्तर प्रदेश) - नोएडा पोलिसांनी रविवारी डीएनडी पुलावर काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. प्रियंंका गांधी हाथरस सामूहिक अत्याचारातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी चालल्या होत्या, त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडविले होते. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली होती.
नोएडा पोलिसांनी डीएनडी पूल घटनेबद्दल केले ट्विट, व्यक्त केली दिलगिरी - नोएडा पोलीस ट्विट बातमी
प्रियंका गांधी-वाड्रा यांना शनिवारी दिल्ली-नोएडा डायरेक्ट (डीएंडडी) पुलापर पोलिसांनी धक्का दिला होता. त्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून होणाऱ्या लाठीचार्ज पासून वाचविण्याचा प्रयत्न करत होते. प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्ते पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी हाथरसला जाण्यासाठी प्रयत्न करत होते. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना यावेळी वाचविण्यासाठी प्रियंका गांधी बॅरिकेटवरुन उडी मारत असल्याचे दिसत आहे.
![नोएडा पोलिसांनी डीएनडी पूल घटनेबद्दल केले ट्विट, व्यक्त केली दिलगिरी noida police tweeted about the dnd pool incident expressing regret for priyanka gandhi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9049527-120-9049527-1601824047220.jpg)
नोएडा पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे, की "नोएडा पोलिसांना डीएंडडी पूलावरील गर्दीवर नियंत्रण मिळवताना प्रियंका गांधी यांच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी खेद वाटत आहे. या प्रकरणाची दखल मुख्यालयाने घेतली असून याची चौकशी करण्यासाठी एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच नोएडा पोलीस सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटीबद्ध आहे. महिलांचा सन्मान आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे."