स्टॉकहोम -साहित्य विषयातील २०१८ चा नोबेल पोलीश लेखिक ओल्गा टोकार्कजुक यांना देण्यात आला आहे. तर, ऑस्ट्रेलियन लेखक पीटर हैंडके हे २०१९ च्या साहित्य विषयातील नोबेलचे मानकरी ठरले आहेत. मागील वर्षी झालेल्या घोटाळ्यामुळे पुरस्कारासाठी कोणाचेही नाव निवडले गेले नव्हते. त्यामुळे २०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षांच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा आज करण्यात आली.
नोबेल २०१९ : साहित्य विषयातील २०१८ आणि २०१९ चे नोबेल विजेते जाहीर! - नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा
२०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षांच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा आज करण्यात आली.
आतापर्यंत शरीरविज्ञान/वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि साहित्य या विषयांतील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उद्या (११ ऑक्टोबर) शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होईल. त्यानंतर, १४ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येईल.
नऊ दशलक्ष क्रोनोर (९,१८,००० अमेरिकी डॉलर्स) रोख रक्कम, सुवर्णपदक आणि पदवी असे या पुरस्काराचे स्वरुप असते. अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिवशी (१० डिसेंबर) स्टॉकहोममध्ये पाच विषयांतील नोबेल पारितोषिकांचे वितरण केले जाते. त्याच दिवशी नॉर्वेमध्ये सहाव्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे वितरण केले जाते.