स्टॉकहोम - नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा 5 ते 12 ऑक्टोबरदरम्यान करण्यात येत आहे. आज रसायनशास्त्र विषयातील यावर्षीचे नोबेल पारितोषिक इमॅन्युएल चार्पेंटीयर आणि जेनिफर ए. दौदना यांना जिनोम एडिटिंगसाठी (गुणसुत्रांत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया) नवी पद्धती विकसित केल्याबद्दल जाहीर झाला आहे. तसेच 8 ऑक्टोबरला साहित्य, 9 ऑक्टोबरला शांतता आणि 12 ऑक्टोबरला अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे.
जेनिफर ए. दौदना यांचा जन्म 1964 मध्ये वॉशिंग्टनमध्ये झाला होता. त्या प्राध्यपक आहेत. तर इमॅन्युएल चार्पेंटीयर यांचा जन्म 1968 मध्ये फ्रान्समध्ये झाला आहे. जर्मनीच्या बर्लिनमधील रोगविज्ञान शास्त्रातील मॅक्स प्लॅक युनिटच्या त्या संचालक आहेत.