कोलकाता - राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारावर नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'भारत एक धर्म निरपेक्ष देश असून धार्मिक आधारावर विभागला जाऊ शकत नाही, दिल्लीमध्ये अल्पसंख्यकांवर अत्याचार होत असताना ते रोखण्यास पोलीस अपयशी ठरल्याचे' सेन म्हणाले.
कोलकात्यात आयोजित एका कार्यक्रमात अमर्त्य सेन बोलत होते. 'हिंसा रोखण्यास पोलीस अपयशी ठरले की, सरकारकडून प्रयत्न कमी पडले याची चौकशी व्हायला पाहिजे. देशाची राजधानी आणि केंद्राच्या ताब्यात असलेल्या दिल्लीत अशी घटना घडल्याने मी चिंतीत आहे. अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असताना पोलीस आपले कर्तव्य निभावण्यात कमी पडत असतील तर हे काळजी करण्यासारखे आहे', असे सेन म्हणाले.