महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रसारमाध्यमांनो, तुम्ही काय करत आहात, ते पंतप्रधान मोदींना समजतंय - बॅनर्जी - ते पंतप्रधान मोदींना समजतंय

पंतप्रधानांची भेट हा एक अद्वितीय अनुभव होता, असे बॅनर्जींनी सांगितले. तसेच, एका प्रश्नाला उत्तर देताना 'मोदींनी तुमच्यावर विनोद करत संभाषणाला सुरुवात केली. प्रसारमाध्यमांनो, तुम्ही काय करत आहात, ते पंतप्रधान मोदींना समजतंय,' असे म्हणत प्रसारमाध्यमांना कोपरखळी मारली.

बॅनर्जी

By

Published : Oct 22, 2019, 3:21 PM IST

नवी दिल्ली - नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर पंतप्रधानांची भेट हा एक अद्वितीय अनुभव होता, असे बॅनर्जींनी सांगितले. तसेच, एका प्रश्नाला उत्तर देताना 'मोदींनी तुमच्यावर विनोद करत संभाषणाला सुरुवात केली. प्रसारमाध्यमांनो, तुम्ही काय करत आहात, ते पंतप्रधान मोदींना समजतंय,' असे म्हणत प्रसारमाध्यमांना कोपरखळी मारली.

पंतप्रधानांच्या भेटीविषयी अभिजित बॅनर्जी माध्यमांशी बोलत होते. 'मला भेटल्यांतर पंतप्रधानांनी सुरुवातीलाच प्रसारमाध्यमांवर जोरदार विनोद केला. मोदी-विरोधी प्रचार-प्रसार करून ते माझी प्रतिमा मलीन करण्याच्या आणि मला अडकवण्याच्या प्रयत्नात आहेत, असे मोदींनी सांगितले. त्या वेळी पंतप्रधान मोदी टीव्ही पाहात होते. ते तुम्हा सर्वांना पाहात होते. त्यांना माहीत आहे, तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहात,' असे बॅनर्जी म्हणाले.

याआधी पंतप्रधान मोदींनी बॅनर्जी यांच्या भेटीविषयी ट्विट केले आहे. भारताला बॅनर्जी यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 'नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्याशी चांगली भेट झाली. त्यांच्याशी बोलताना मानवी सक्षमीकरणाबद्दलची त्यांची आवड स्पष्टपणे दिसून येते. आमच्यात निरनिराळ्या विषयांवर व्यापक संवाद झाला. भारताला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा,' असे ट्विट मोदींनी केले आहे.

नोबेल सारखा जागतिक सन्मान मिळाल्यानंतर अभिजीत बॅनर्जी पहिल्यांदाच भारत भेटीवर आले आहेत. दरम्यान, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ते कोलकात्यात जाऊन आपल्या आईची भेट घेणार आहेत, तसेच दोन दिवस कोलकात्यात घालवणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details