हैदराबाद- तेलंगणाच्या कामरेड्डी जिल्ह्यातील एका एचआयव्हीबाधित रुग्णाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. मात्र, लॉकडाऊनमुळे वाहने उपलब्ध नव्हती. अशात या व्यक्तीचा मृतदेह सायकलवरुन शासकीय रुग्णालयात पोहोचवण्यात आला .
लॉकडाऊनचा परिणाम; एचआयव्हीबाधितांचा मृतदेह सायकलवरुन पोहोचवला रुग्णालयात
हा व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून एचाआयव्हीबाधित होता. शनिवारी रात्री या रुग्णाचा गरिबांसाठी असलेल्या एका आश्रमात मृत्यू झाला. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पोहोचवण्यासाठी कोणीही तयार नव्हते. पोलिसांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मृतदेह रुग्णालयात पोहोचवण्याची विनंती केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून एचआयव्हीबाधित होता. शनिवारी रात्री या रुग्णाचा गरिबांसाठी असलेल्या एका आश्रमात मृत्यू झाला. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पोहोचवण्यासाठी कोणीही तयार नव्हते. पोलिसांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मृतदेह रुग्णालयात पोहोचवण्याची विनंती केली.
रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नसल्याने बेटशीटमध्ये हा मृतदेह ठेवण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांनी सायकलवरुनच मृतदेह रुग्णालयात पोहोचवला. अधिकाऱ्यांना या मृतदेहाजवळ एक फोन नंबर मिळाला. यानंतर निर्मल जिल्ह्यातील मृताच्या कुटुंबीयांना मृत्यूबद्दलची माहिती देण्यात आली.