महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : मोतिहारीमध्ये लहान मुलांनी सुरू केली प्लास्टिकविरोधी मोहीम, पाहा खास रिपोर्ट

बिहारमध्ये प्लास्टिकविरोधी आंदोलनात अंगणवाडीच्या लहान-लहान मुलांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. सध्या 'सिंगल यूज प्लास्टिक'विषयी सर्वांमध्येच जागरूकता येणे आवश्यक आहे. पूर्व चंपारण येथील मधूछपरा गावातील अं गणवाडी शाळेत जाणारी ही मुले आहेत. ती सर्व वडिलधाऱ्या-ज्येष्ठांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करत आहेत.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक
नो टू सिंगल यूज प्लास्टिक

By

Published : Jan 4, 2020, 11:16 AM IST

मोतिहारी - बिहारमध्ये प्लास्टिकविरोधी आंदोलनात अंगणवाडीच्या लहान-लहान मुलांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. सध्या 'सिंगल यूज प्लास्टिक'विषयी सर्वांमध्येच जागरूकता येणे आवश्यक आहे. पूर्व चंपारण येथील मधूछपरा गावातील अंगणवाडी शाळेत जाणारी ही मुले आहेत. ती सर्व वडिलधाऱ्या-ज्येष्ठांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करत आहेत.

अंगणवाडीचा विद्यार्थी बिट्टू कुमार याने आपल्या वडिलांना एकदाच वापर करण्यायोग्य प्लॅस्टिकचा वापर टाळण्यास सांगत असल्याचे म्हटले आहे. तसेच, तो आजूबाजूच्या इतर लोकांनाही प्लॅस्टिकचा वापर न करण्याविषयी सांगतो.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक

हेही वाचा - गुजरातमधील ही नगरपालिका बनवते प्लास्टिकपासून इंधन..

कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मुलांनी प्लॅस्टिकविषयी जागरूकता करणारे तक्ते बनवून लावले आहेत. गावाच्या डंपिंग यार्डाच्या आजूबाजूलाही हे तक्ते लावण्यात आले आहेत. डंपिंग यार्डाच्या चारही बाजूंना प्लास्टिकचे ढिगारे पडलेले पहायला मिळतात. मात्र, मुलांच्या या मोहिमेमुळे गावामध्ये एकदाच वापरण्यायोग्य प्लॅस्टिकविषयी जागरूकता होण्यास मदत होत असल्याचे गावकरी सांगत आहेत. हा एक सकारात्मक बदल असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे.

स्थानिक ग्रामस्थ राम नारायण पांडे यांनी ही सर्व मुले प्लॅस्टिकविरोधी आणि जागरूकता करणाऱ्या घोषणा देत गावातून पदयात्रा काढत असल्याचे सांगितले. यामुळे गावकऱ्यांकडून प्लॅस्टिकचा वापर कमी होत आहे. अंगणवाडी केंद्रात मुलांना सुशिक्षित बनवावे, यासोबतच प्लॅस्टिकचा वापर कमी करावा, यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले जाते.

हेही वाचा - प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलाय हा जगातील सर्वात मोठा 'चरखा'..!

अंगणवाडी संचालक विद्यांती देवी यांनी लहान मुलांना प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक असल्याचे सांगत असल्याचे म्हटले आहे. यानंतर सर्व लहान मुले घरी गेल्यानंतर ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगून त्यांना प्लॅस्टिकचा वापर न करण्याविषयीही सांगतात. तसेच, विद्यांती देवी स्वतःही अंगणवाडीत येणाऱ्या आई-वडिलांना प्लॅस्टिकच्या दुष्प्रभावाविषयी मार्गदर्शन करतात.

सध्या राज्य सरकार एकदाच वापर करण्यायोग्य प्लॅस्टिकच्या वापरावर प्रतिबंध लावत आहे. मात्र, अनेकजण या नियमांचे उल्लंघन करतानाही दिसत आहेत. असे असले तरी अंगणवाडीची लहान-लहान मुले या सर्वांच्या पलीकडे जाऊन प्लॅस्टिकमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. यामुळे त्यांच्या घरातील वयस्कर मंडळीही त्यांचे अनुसरण करण्याची आशा निर्माण झाली आहे.

हेही वाचा - टाकाऊतून टिकाऊ : हिमाचलमधील कल्पना ठाकूर यांचा अभिनव उपक्रम..

ABOUT THE AUTHOR

...view details