तिरुपूर - लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर देशातील अनेक राज्यात मद्यविक्री सुरू झाली आहे. मात्र, दारु खरेदी करताना नागरिक मोठी गर्दी करत आहेत. अनेक वेळा गोंधळ उडाल्याने पोलिसांना लाठीचार्जही करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जातात. यावर तामिळनाडू राज्यातील तिरुपूर जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनव उपाय शोधला आहे.
'छत्री नाही, तर दारु नाही', तामिळनाडू सरकारने यासाठी घेतला हा निर्णय - दारु विकत घेण्यासाठी छत्री अनिवार्य
छत्री घेवून दारुच्या दुकानाबाहेर रांगेत उभे राहिले नाही तर दारु मिळणार नाही, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. त्यामुळे दारु मिळण्यासाठी छत्री गरजेची बनली आहे.
छत्री घेवून दारुच्या दुकानाबाहेर रांगेत उभे राहिले नाही तर दारु मिळणार नाही, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. त्यामुळे दारु मिळण्यासाठी छत्री गरजेची बनली आहे. छत्री घेऊन रांगेत ऊभे राहिले तर आपोआप एकमेकांमध्ये अंतर राहून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होईल, हा विचार त्यामागे आहे.
तिरूपूरचे जिल्हाधिकारी के. विजय कार्तिकेयन यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्विटवरूनही त्यांनी हा आदेश जाहीर केला आहे. 'नो अंम्ब्रेला नो अल्कोहोल' सामाजिक अंतर राखण्यासाठी हा निर्णय असे ट्विट त्यांनी केले आहे.