रांची - झारखंडमधील आरा आणि केरम या दोन गावांना पाणी व्यवस्थापनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विशेष पारितोषिक मिळाले आहे. मात्र, तेवढ्यावरच न थांबता दुर्गम भागातील ही दोन गावे आता 'सिंगल यूज' म्हणजेच एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीपासून २५ किलोमीटर दूर असलेल्या या गावामधील ग्रामपंचायत प्लास्टिकमुक्तीसाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी पंचायतीचे सदस्य हे गावांमध्ये जनजागृती करतात. तसेच प्लास्टिक कचरा करणाऱ्यांकडून ते दंडही वसूल करतात. पंचायतीने घेतलेल्या या निर्णयाला गावकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गावातील लोक आता प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरू लागले आहेत. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या गावातील रहिवासी बाबूराम गोप यांनी प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सांगितले.