पर्यावरण रक्षणासाठी आंध्र प्रदेशातील इंद्रकीलाद्री मंदिरात प्लास्टिक बंदी - पर्यावरण रक्षण बातमी
कृष्णा नदी काठाजवळच्या एका डोंगरावर प्रसिद्ध इंद्रकीलाद्री मंदिर आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना प्लास्टिक पिशव्या परिसरात न आणण्याचे आवाहन केले आहे. जो व्यक्ती मंदीर प्रशासनाचा आदेश पाळणार नाही, त्याला दंड करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
विजयवाडा - आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहराला 'सिंगल युज प्लास्टिक' मुक्त करण्यासाठी दुर्गा इंद्रकीलाद्री मंदिराने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंदिर परिसरात प्लास्टिक पिशव्या वापरण्यास आणि आणण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
कृष्णा नदी काठाजवळच्या एका डोंगरावर प्रसिद्ध इंद्रकीलाद्री मंदिर आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना प्लास्टिक पिशव्या परिसरात न आणण्याचे आवाहन केले आहे. जो व्यक्ती मंदिर प्रशासनाचा आदेश पाळणार नाही, त्याला दंड करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पर्यावरण अधिकारी, सरकारी अधिकारी आणि बिगर सरकारी संस्था या धार्मिक स्थळाला प्लास्टिक मुक्त बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मंदिर अधिकारी सुरेश बाबू म्हणाले, की आम्ही मंदिर परिसरात प्लास्टिक पिशव्या आणण्यास बंदी घातली आहे. पोस्टर, माध्यमांतून आणि मंदिर परिसरात घोषणा देऊन आम्ही यासाठी जनजागृती करत आहोत. इंद्रकीलाद्री डोंगरावर प्लास्टिक पिशव्या आणू नका, असे आवाहन आम्ही भाविकांना करत आहोत. या नियमांचे जर कोणी उल्लंघन केले तर आमचे पथक त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करते. प्रसाद वाटण्यासाठी आम्ही जैवविघटन होऊ शकणाऱ्या पिशव्या वापरत आहोत.