श्रीनगर - पुलवामा हल्ल्यानंतर ४१ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यातले २५ जैश-ए-मोहम्मदमध्ये सक्रीय होते. यात १३ दहशतवादी पाकिस्तानी होते, अशी माहिती जीओसी १५ कोरचे केजेएस धिल्लाँ यांनी दिली. दहशतवादाविरुद्ध संरक्षण दलाने उघडलेल्या मोहिमेनंतर दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक काश्मिरी तरुणांचे भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी माहिती देण्यात आली.
काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे नेतृत्व स्वीकारण्यास कोणीच तयार नाही - धिल्लाँ - police
आज लष्कर आणि पोलिसांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दीलबाग सिंह हेही उपस्थित होते. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई अशीच सुरू राहील. त्यांना डोकं वर काढू देणार नाही, असे धिल्लाँ म्हणाले.

आज लष्कर आणि पोलिसांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दीलबाग सिंह हेही उपस्थित होते. २०१८ मध्ये एकूण २७२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच, मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या वर्षात आतापर्यंत ६९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून १२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई अशीच सुरू राहील. त्यांना डोकं वर काढू देणार नाही, असे धिल्लाँ यांनी सांगितले. काश्मीरमध्ये आम्ही जैश-ए-मोहम्मदच्या नेतृत्वाला लक्ष्य केले. त्यामुळे आता अशी परिस्थिती तयार झाली आहे, की काश्मीर खोऱ्यात कोणीही जैशचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्यास तयार नाही, असे धिल्लाँ म्हणाले.