नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये लडाख सीमारेषेवरून तणाव असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. भारताच्या भूभागाचे संरक्षण करण्यासाठी मोदी सरकार पूर्णपणे दक्ष असल्याचे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सांगितले. भारताची एक इंच जमीन सुद्धा कोणी घेऊ शकत नाही, असे शाह यांनी म्हटले. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
'भारताचा एक इंच भूप्रदेशही कोणी घेऊ शकत नाही'
पूर्व लडाखमध्ये चीनबरोबरील वाद निवळण्यासठी केंद्र सरकराकडून प्रयत्न आहेत. देशाचा सार्वभौमपणा आणि सुरक्षितता यांचे संरक्षण करण्यासाठी सरकार बांधील असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले
अमित शाह म्हणाले, की लडाखमध्ये चीनबरोबर असलेली समस्या सोडविण्यासाठी भारताकडून शक्य तेवढी सैन्यदलाची आणि राजनैतिक पावले उचलण्यात येणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. आपल्या भूमीच्या प्रत्येक इंच जमिनीसाठी आम्ही दक्ष आहोत. ती भूमी कोणीही घेऊ शकत नाही. आपले सैन्यदल आणि नेतृत्व हे देशाचा सार्वभौमपणा आणि सीमेचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे.
देशाचा सार्वभौमपणा आणि सुरक्षितता यांचे संरक्षण करण्यासाठी सरकार बांधील असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढणारे ३७० वे कलम रद्द केल्याने परिस्थिती काय बदलली आहे, हे विचारले असा अमित शाह यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की कोरोनाच्या संकटातही जम्मू काश्मीरमध्ये सध्या सामान्यस्थिती आहे.