नवी दिल्ली- मला आम आदमी पार्टीचे राजकारण चांगले वाटते, मी केजरीवाल यांच्या विचाराने प्रभावित झालो आहे. कर्नाटकमध्ये आम आदमी पार्टी नाही. मी कर्नाटकमधील केजरीवाल बनेन आणि मला असे बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.
मला कर्नाटकचा केजरीवाल बनण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही - प्रकाश राज - Kejriwal
ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी प्रकाश राज यांच्याशी संवाद साधला. देशासाठी चांगला विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण उभे राहायला हवे असल्याचे ते म्हणाले.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी प्रकाश राज यांच्याशी संवाद साधला. यावेळी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की 'त्यांचा विचार चांगला आहे. देशासाठी चांगला विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण उभे राहायला हवे.'
प्रसिध्द अभिनेते प्रकाश राज हे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या प्रचारासाठी गेले होते. प्रकाश राज हे स्वत: बंगळुरू मध्यमधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी बेगूसरायमध्ये कन्हैया कुमार तर महाराष्ट्रात राजू शेट्टी यांचा प्रचार केला होता.