श्रीनगर :जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात कोणत्याही हिंसात्मक घटना घडू नये, म्हणून सैन्य तैनात करण्यात आले आहे. यावर 'जम्मू अॅण्ड काश्मीर पीपल्स मूव्हमेंट'ची नेता शेहला राशीद हिने सैन्यदलावर अनेक आरोप केले होते. यावर भारतीय लष्काराने हे आरोप फेटाळले असून आज जम्मू-काश्मीरच्या माहिती व जनसंपर्क संचालक सईद सेहरिश असगर यांनी राज्यात सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे म्हटले आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेची संबंधित कोणतीही कोणतीही वाईट घटना घडली नसून सर्व काही सुरळीत आहे. या परिस्थितीमध्ये जनता सहकार्य करत असून काही लोक मुद्दाम अफवा पसरवत आहेत. लोकांनी या अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सईद सेहरिश असगर यांनी केले आहे.