नवी दिल्ली - प्लाझ्मा थेरपी प्रायोगिक(ट्रायल) टप्प्यावर असून कोरोना रुग्णांवर ही थेरपी उपयुक्त ठरेल, असा कोणताही पुरावा अद्याप मिळाला नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केले. कोरोनावरील उपचारासाठी कोणतीही थेरपी अद्याप प्रमाणित करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरले असे नाही, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारासाठी उपयुक्त ठरेल, असा पुरावा नाही - केंद्रीय आरोग्य मंत्रालय - plasma therapy
जोपर्यंत आयसीएमआर प्लाझ्मा थेरपीचे निष्कर्ष काढत नाही, आणि साईन्टिफिक पुरावा मिळत नाही, तोपर्यंत प्लाझ्मा थेपरी फक्त संशोधन आणि ट्रायलसाठी वापरली जाईल - आरोग्य मंत्रालय
प्लाझ्मा थेरपी कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना किती प्रभाविपणे काम करते हे जाणून घेण्यासाठी आयसीएमआरने राष्ट्रीय स्तरावर अभ्यास सुरू केला आहे. जोपर्यंत आयसीएमआर प्लाझ्मा थेरपीचे निष्कर्ष काढत नाही, आणि साईन्टिफिक पुरावा मिळत नाही, तोपर्यंत प्लाझ्मा थेपरी फक्त संशोधन आणि ट्रायलसाठी वापरली जाईल. जर प्लाझ्मा थेरपी योग्य रितीने हाताळली नाही, तर रुग्णाचा जीवही जाऊ शकतो, असे अगरवाल यांनी सांगितले.
कोरोनाग्रस्त रुग्ण दर 10.2 दिवसांनी दुप्पट होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील 24 तासांत 1 हजार 543 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून देशात 29 हजार 435 एकूण रुग्ण झाल्याचे सांगितले.