महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून कोणताही संवाद नाही; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालय कार्यालयाच्या प्रवक्त्या आईशा फारूकी यांनी भारत सरकारसोबत कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याबाबत संवाद साधला असल्याचे सांगितले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव श्रीवास्तव यांनी पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला.

By

Published : Aug 7, 2020, 8:00 AM IST

Kulbhushan Jadhav
कुलभूषण जाधव

नवी दिल्ली-कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. इस्लामाबाद न्यायालयाच्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून कोणताही संवाद झाला नाही, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानकडून संपर्क झाला आहे का? असे त्यांना विचारण्यात आले होते.

इस्लामाबाद न्यायालयाने कुलभूषण जाधवप्रकरणी सुनावणी दरम्यान वकिलाची नियुक्ती करण्याबाबत भारतीय अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, अशा सूचना सोमवारी दिल्या होत्या. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालय कार्यालयाच्या प्रवक्त्या आईशा फारूकी यांनी भारत सरकारसोबत कुलभूषण जाधव याच्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याबाबत संवाद साधला असल्याचे सांगितले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव श्रीवास्तव यांनी पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला. पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आढावा घेऊन त्या बाबींची पूर्तता आणि अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे म्हटले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा आढावा घेत त्याची अंमलबजावणी करणे, अशा मूलभूत गोष्टी पाकिस्तानने पूर्ण करणे गरजेचे आहे. कुलभूषण जाधव याची बाजू मांडण्यासाठी वकिलाची नियुक्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाकिस्तानने कोणत्याही अटी न घालता आम्हाला कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली.

कुलभूषण जाधव प्रकरणी वकिलाची नियुक्ती करण्याबाबत भारतीय अधिकाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळावी, अशा सूचना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी दिल्या होत्या. मुख्य न्यायाधीश अतहर मिनल्ला आणि न्यायाधीश मियांगुल हसन औरंगजेब या दोन सदस्यांच्या विशेष खंडपीठाने कुलभूषण जाधव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील देण्याच्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयाने भारतीय अधिकाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी द्यावी, असे म्हटले याबाबतचे वृत्त एक्सप्रेस ट्रिब्यूनने प्रकाशित केले आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणावरील सुनावणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 3 सप्टेंबर पर्यंत स्थगित केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान मधून 2016 मध्ये हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन अटक केली, असा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. इरानियन पोर्ट चबहार येथून पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले, असा भारताचा दावा आहे. 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तान लष्करी न्यायालयाच्या या निर्णयाला 2019 च्या जुलै महिन्यात स्थगिती दिली. भारत सरकारने या प्रकरणी पाकिस्तान व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details