नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशामध्येही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तबलिगी जमतीच्या कार्यक्रमाचा आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर परिणाम झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
'तबलिगी कार्यक्रमामुळे कोरोना प्रसार वाढला, 23 राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांवर परिणाम'
देशामधील एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल 4 हजार 291 कोरोनाबाधित हे तबलिगी जमातीच्या संपर्कात आलेले आहेत. तसेच तामिळनाडू (84 टक्के), तेलंगणा (79 टक्के), दिल्ली ( 63 टक्के), उत्तर प्रदेश (59 टक्के) आणि आंध्र प्रदेश (61 टक्के) प्रकरणे तबिलगी जमातीसंबधित आढळली आहेत.
निजामुद्दीन येथे झालेल्या वार्षिक धार्मिक संमेलनामध्ये सहभाग घेतलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. सहभागी झालेले सदस्य देशाच्या विविध भागात परतल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे. देशामधील एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल 4 हजार 291 कोरोनाबाधित हे तबलिगी जमातीच्या संपर्कात आलेले आहेत. तसेच तामिळनाडू (84 टक्के), तेलंगणा (79 टक्के), दिल्ली ( 63 टक्के), उत्तर प्रदेश (59 टक्के) आणि आंध्र प्रदेश (61 टक्के) प्रकरणे तबिलगी जमातीसंबधित आढळली आहेत.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.