महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नितीश कुमार सातव्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ - बिहार उपमुख्यंत्री

जनता दल यूनायटेड पक्षाचे नेते (जेडीयू) नितीश कुमार उद्या (सोमवार) सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

नितीश कुमार
नितीश कुमार

By

Published : Nov 15, 2020, 9:46 PM IST

पाटणा - जनता दल यूनायटेड पक्षाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार उद्या (सोमवार) सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज (रविवार) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विधीमंडळाची बैठक पार पडली. यात नितीश कुमार यांना एकमताने नेतेपदी निवडण्यात आले. यानंतर त्यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेवून सत्ता स्थापनेचा दावा केला.

नितीश कुमार यांनी घेतली राज्यपालांची भेट

काय म्हणाले नितीश कुमार

राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, राज्यपालांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. त्यांनी हे पत्र स्वीकारून मला मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. उद्या सायंकाळी शपथविधी होईल. कोण-कोण शपथ घेईल याची माहिती थोड्याचवेळात तुम्हाला मिळेल, असे नितीश कुमार म्हणाले.

आम्ही राज्यपालांकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपा, जनता दल युनायटेड, हिंदुस्तानी अवामी मोर्चा, विकसशील इन्सान पार्टी या पक्षातील नवनियुक्त आमदारांची यादी सोपविली असून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांनी आमचे पत्र स्वीकारले आहे. त्यांनी सत्ता स्थापनेसाठी आम्हाला आमंत्रण दिले आहे, असे नितीश कुमार यांनी सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्री पदासाठी कोण उमेदवार असेल याबाबत त्यांनी मौन बाळगले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजप नेते सुशील कुमार मोदी राज्यपाल चौहान यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आज (रविवार) नितीश कुमार यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली. एनडीएच्या विधिमंडळाची बैठक रविवारी बोलावण्यात आली होती, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. एनडीएमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांची निवड होते की, नाही याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, निवडणुकीपूर्वीच ठरल्याप्रमाणे नितीश कुमार यांचीच मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात येईल, असे भाजपाने स्पष्ट केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details