नवी दिल्ली - मोटर वाहन दुरुस्ती विधेयक 2019 आज बुधवारी राज्यसभेत पास झाले आहे. ट्रफिक नियम तोडल्यानंतर भरण्यात येणाऱ्या चलानची रक्कम 10 ट्क्क्यांनी वाढवण्यात आली आहे.
देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे १.५ लाख नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. अपघाताची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.
हेल्मेट नसल्यास हजार रुपये दंड-
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दुरुस्ती विधेयकामध्ये कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. विना हेल्मेट फिरल्यानंतर पुर्वी 100 रुपयांचे चलान लागत होते. मात्र आता 1 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. याचबरोबर विधेयकात तीन महिण्यासाठी लायसन्स जप्त करण्याचा नियम आहे.
वाहन चालवताना फोनवर बोलल्यास ५ हजार दंड-
वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे अपघात होतात. याची गंभीर दखल या विधेयकात घेतली आहे. वाहन चालवताना फोनवर बोलल्यास 1000 रुपये दंड भरावा लागत होता. आता ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.