नवी दिल्ली - भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यास नितीन गडकरी पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू शकतात, असे मत पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्वामी यांनी हे भाकीत केले. मात्र, निवडणुकांच्या निकालावरच हे अवलंबून असेल, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
स्वामींनी मुलाखतीत सांगितले की, भाजपला २३० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर मोदींना पुन्हा पंतप्रधान पद मिळणार नसल्याची शक्यता आहे. जर, भाजपने २३० किंवा २२० जागा जिंकल्या आणि एनडीए पक्षांना ३० जागा मिळाल्या तर हा आकडा केवळ २५० वरच पोहोचेल. त्यानंतर बहुमतासाठी पुन्हा ३० जागा गरजेच्या आहेत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.