दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाच्या संचालन परिषदेची पाचवी बैठक राष्ट्रपती भवन येथे पार पडली. बैठकीत दुष्काळ, कृषी क्षेत्रातील आव्हाने, पावसाच्या पाण्याचे नियोजन, खरीप पिकांची तयारी या प्रमुख मुद्यांवर चर्चा पार पडली.
अधिकृत माहितीनुसार, बैठकीतील पाच सुत्री अजेंडामध्ये जिल्हा कार्यक्रम, कृषी क्षेत्रात बदल, सुरक्षाविषयी मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. बैठकीत नक्षलग्रस्त जिल्ह्याबाबत महत्वाची चर्चा करण्यात आली. बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित राज्यांचे उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि वरीष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीत सामिल होण्यास नकार दिला आहे. तर, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग वैयक्तीक कारणामुळे उपस्थित नव्हते.