नवी दिल्ली - पटियाला हाऊस न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषींबाबत नव्याने डेथ वॉरंट काढण्यास नकार दिला आहे. यानंतर निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. जर कायदा दोषींना जगण्याची परवानगी देत असेल तर त्यांना फाशी देणं पाप होईल, अशी उद्गविग्न भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
निर्भया प्रकरणातील दोषींना अद्यापही फाशी नाही; निर्भयाच्या आईची उद्गविग्न प्रतिक्रिया - पटियाला हाऊस कोर्ट
पटियाला हाऊस न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषींबाबत नव्याने डेथ वॉरंट काढण्यास नकार दिला आहे. यानंतर निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.
दोषींना फाशी देण्यासाठी न्यायालयाने दोनदा डेथ वॉरंट जारी केला होता. मात्र, दोन्ही वेळेस डेथ वॉरंट टळला. नव्याने डेथ वॉरंट जारी करावा, अशी याचिका दिल्ली सरकारने पटियाला हाऊस न्यायालयात केली होती. मात्र, दोषींना फाशी देण्याबाबत कोणताही वॉरंट काढण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. कायदेशीर प्रक्रियेमध्ये वेळ जात असल्याने दोषींना फाशी देण्यास दिरंगाई होत आहे. तसेच दोषींकडून प्रत्येक वेळी नव्याने कायदेशीर मार्गांचा वापर होत आहे.
फक्त पवनकडे शिल्लक आहे कायदेशीर मार्ग
दोषींनी क्युरेटीव्ह पिटिशन आणि दया याचिकांचा वापर करून शिक्षेपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. यातील तिन्ही आरोपींचे बचावाचे मार्ग संपुष्टात आले आहेत. फक्त पवन वर्माकडे क्यरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा मार्ग शिल्लक राहिला आहे.