महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बलात्काराच्या घटनांनी नेटिझन्स संतप्त; ट्विटरवर 'निर्भया' ट्रेण्डिंग

ट्विटरवर वापरकर्त्यांनी तामिळनाडूमधील कांचीपुरम, हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवरील बलात्काराचा उल्लेख करत ट्विट केले आहे. त्यामुळे हैदराबादसह तामिळनाडूमधील पीडितेच्या नावाचे हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेण्डमध्ये होते.

Nirbhaya Twitter trend
संपादित - निर्भया ट्विटर ट्रेण्ड

By

Published : Nov 30, 2019, 3:18 AM IST

Updated : Nov 30, 2019, 5:33 AM IST

मुंबई- दिल्लीतील निर्भयावरील बलात्कार व तिची अमानुष हत्या आठवून देणाऱ्या घटना एकापाठोपाठ घडत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नेटिझन्सनी ट्विटरवर निर्भया हॅशटॅग करत महिलांच्या सुरक्षिततेची गरज व्यक्त केली. तसेच दोषींना फाशी देण्याची मागणी केली आहे.

ट्विटरवर वापरकर्त्यांनी तामिळनाडूमधील कांचीपुरम, हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्काराचा उल्लेख करत ट्विट केले आहे. त्यामुळे हैदराबादसह तामिळनाडूमधील पीडितेच्या नावाचे हॅशटॅग ट्रेंडमध्ये होते. तर निर्भयाच्या आरोपींना अद्याप शिक्षा मिळाली नसल्याने अनेकांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे निर्भया हा हॅशटॅग हा ट्विटरवर सुरू राहिला.

हेही वाचा-पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण; ४८ तासांमध्ये आरोपी ताब्यात..

हे आहेत नुकत्याच झालेल्या बलात्काराच्या घटना

  • राजस्थानमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न झाले होते. तिच्यावर पतीसह चार जणांनी अपहरण करून सामूहिक बलात्कार केला. ही माहिती बंडी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सतनाम सिंह यांनी दिली. पीडिता अल्पवयीन असल्याने तिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
  • तामिळनाडूमध्ये कांचीपुरम येथे 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे उघडकीला आले आहे.
  • हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून टाकण्यात आले. त्यानंतर दोन दिवसातच दुसऱ्या एका महिलेलाही जाळून टाकल्याची घडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हैदराबादमध्ये खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले आहे ट्विटर वापरकर्त्यांनी ?

  • जरी तुम्हाला कोणता अनोळखी विश्वासू वाटला तरी विश्वास ठेवू नका. तुमच्या अवतीभोवती राक्षस फिरत आहेत. तुमची सुरक्षा तुमच्या हाती आहे.
  • निर्भयाच्या आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय समाजात स्वच्छता होणार नाही. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कार्यवाही करावी, असे ट्विट करून वापरकर्त्याने अपेक्षा केली.
  • बलात्कार प्रकरणाला धार्मिक-जातीय रंग दिल्याबद्दलही एका वापरकर्त्याने नाराजी व्यक्त केली आहे. कोणीही पीडिता अथवा तिच्या कुटुंबाबत बोलत नाही. पीडित कोणत्या धर्माची होती म्हणून तिला दोष देवू नका, अशी अपेक्षा वापरकर्त्याने व्यक्त केली आहे.
  • बलात्कारातील आरोपीला चीनमध्ये मृत्यूदंड, दक्षिण कोरियात जाळून तर इस्त्राईलसह अफगाणिस्तानमध्ये फाशी देवून शिक्षा दिली जाते. तर भारतात बलात्कार प्रकरणातील आरोपींवरील राग व्यक्त सोशल मीडियातून व्यक्त केला जातो. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या दयेचा अर्ज प्रलंबित, अशा शब्दात एका ट्विटरच्या वापरकर्त्याने भावना व्यक्त केली आहे.
  • एका वापरकर्त्याने हैदराबादमधील पीडितेचा जळालेला फोटो टाकून अश्रू दर्शविणारी इमोजी पोस्ट केली आहे. त्या फोटोतील जळालेल्या पीडितेचा देह झाकलेला दाखविण्यासाठी माझ्याकडे टूल्स नाहीत, असे म्हणत त्याने दु:ख व्यक्त केले आहे.

हेही वाचा-खळबळजनक! हैदराबादमध्ये पुन्हा आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह

Last Updated : Nov 30, 2019, 5:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details