नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश सिंग याने सर्वोच्च न्यायालयात दयेचा अर्ज दाखल केला आहे. तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
मुकेश सिंग आणि विनय शर्मा या दोन आरोपींची फेरविचार याचिका (क्युरेटीव्ह पीटीशन) आज सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली होती. मात्र तरीही, राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज करण्याचा पर्याय त्यांच्याकडे शिल्लक होता. त्याचाच वापर करत, सिंग याने दयेचा अर्ज दाखल केला आहे.