नवी दिल्ली- निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. त्यानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. शविच्छेदनानंतर दोषींच्या कुटुंबीयांनी मृतदेह मागितले तर ते त्यांच्याकडे सोपविण्यात येतील अन्यथा तुरुंग प्रशासन चौघांवर अंत्यसंस्कार करेल, असे तिहार कारागृहाच्या महासंचालकांनी स्पष्ट केले.
निर्भया प्रकरण : चौघांचे मृतदेह कुटुंबीयांनी स्वीकारले नाही तर... - निर्भया खटला
दिल्लीतील दिनदयाल रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. मुकेश आणि विनयने फाशीवर जाण्याआधी जेवण केले, तर अक्षयने फक्त चहा घेतला.
दिल्लीतील दीनदयाल रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. मुकेश आणि विनयने फाशीवर जाण्याआधी जेवण केले, तर अक्षयने फक्त चहा घेतला. विनय किंचित रडला, मात्र, नंतर सर्वजण शांत होते. त्यांना सतत न्यायालयाच्या आदेशांची माहिती देण्यात येत आहे, अशी माहिती कारागृह महासंचालकांनी दिली.
निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. त्यामुळे पीडितेसह कुटुंबीयांना सात वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. फाशी देण्याच्या काही तासांपूर्वी दोषींच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. पहाटे अडीच ते सव्वा तीन वाजेपर्यंत सुनावणी घेण्यात आली. यात फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र, ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती.